हनी सिंगने बनवली जबरदस्त बॉडी

621

प्रसिद्ध रॅप सिंगर हनी सिंगच्या नव्या गाण्याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट बघत असतात. मात्र सध्या हनी सिंग काही दिवसांसाठी फॅन्सपासून दूर आहे. असं असलं तरी त्याचे हाय मेरा दिल, अंग्रेजी बीट, ब्राऊन रंग, ब्लू आईज, लुंगी डान्स ही लोकप्रिय गाणी आजही सुपरहिट आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात हनीने साऱयांनाच चकित करून सोडलंय. अन्य सेलिब्रेटींप्रमाणे त्याने बॉडी ट्रान्सफर्मेशन करून फॅन्सला ’फिटनेस गोल’ दिलाय. हनीने कमालीचं वजन घटवलंय आणि ‘मसल गेन’ केलंय. त्याने आपल्या नव्या लुकचे काही फोटो ट्किटरवर शेअर केलेत. या फोटोंना कॅप्शन देताना हनीनं लिहिलंय, माझे बॉडी ट्रान्सफर्मेशनचे फोटो बघा. लॉकडाऊनमध्ये खूप मेहनत केलेय. ज्याला आकडेल तो शेयर करेल.

हनीचे नवे फोटो बघून फॅन्स फारच खूश झाले आहेत. हनीवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. लॉकडाऊनच्या दिवसांचा हनीने सर्कात चांगला उपयोग केल्याचे त्याच्या फॅन्सचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या