नगरमध्ये सैराट, आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहित जोडप्याला जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहित दांपत्याला घरात कोंडून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगेश रणसिंग आणि रुख्मिणी रणसिंग अशी पीडित पती पत्नीची नावं असून. रुख्मिणी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मंगेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगरच्या पारनेर तालुक्यातील निघोज मधील ही दुर्देवी घटना आहे. मंगेश आणि रुख्मिणी यांनी सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र रुख्मिणीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. 1 मे रोजी रुख्मिणीच्या कुटुंबियांनी दोघांनाही मारहाण करून घरत कोंडले व त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रुख्मिणी 2 महिन्याची गर्भवती असून तिचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीचे वडील रामा रामफल भरतीया फरार असून काका सुरेंद्रकुमार भरतीया व मामा घनश्याम  सरोज यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण उत्तरप्रदेशातील रहिवासी असून कामा निमित्ताने  नगरला आले आहेत.