लॉकडाउनमुळे नुकसान, धायरीत हॉटेल व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या नैराश्यातून व्यवसायिकाने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी कामगाराने हॉटेल उघडल्यानंतर आत्महत्येची घटना उघडकीस आली. प्रेमनाथ शेट्टी (वय ४३, रा. धायरी) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ शेट्टी यांचे धायरीत राज नावाचे हॉटेल आहे. मागील सात वर्षांपासून ते हॉटेल चालवीत होते. लॉकडाउनमुळे काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी हॉटेलमध्येच गळफास घेउन आत्महत्या केल्याचे दिसून आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे हॉटेल व्यवसायात शेट्टी यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.