पार्किंगमधून वाहन चोरीला गेल्यास हॉटेल जबाबदार

312

आपण हॉटेलमध्ये गेल्याकर तेथे पार्किंगसाठी जागा असते. पण त्यठिकाणी लिहिलेले असते की, मालकाने आपल्या जबाबदारीवर गाडी पार्क कराकी. पण आता हॉटेलवाल्यांना तसे करता येणार नाही. कारण एका खटल्याचा निकाल देताना सर्कोच्च न्यायालयाने हॉटेल पार्किंगबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हॉटेलच्या पार्किंगमधून गाडी चोरीला गेली तर त्याची जबाबदारी हॉटेलला टाळता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्ली येथील ताजमहाल हॉटेलच्या पार्किंगमधून 1998 मध्ये एकाची मारुती जेन कार चोरीला गेली होती. याबाबत त्याने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निकारण आयोगाकडे दाद मागितली होती. हॉटेलमध्ये ज्या स्थितीत कार पार्क केली होती. त्या स्थितीत ग्राहकाला परत मिळाली पाहिजे, असे सांगून ताजमहाल हॉटेलला आयोगाने 2 लाख 80 हजार रुपयांचा दंड केला होता.

बेपर्वाईने वागल्यास हॉटेल जबाबदार
हा खटला अनेक वर्षे चालला. सर्वोच्च न्यायालयाने आता याबाबत निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, पार्किंगची सर्व्हिस फ्री असल्याचे सांगून हॉटेलला अशा गोष्टीपासून पळ काढता येणार नाही. हॉटेल अगोदरच रूम, फुड, एंट्री फीच्या नाकाखाली सर्व्हिस चार्ज घेत असतात. पार्किंगमधून काहनाची चोरी झाली तर त्याची जबाबदारी हॉटेलची राहील. जर मालकाने गाडीची चाकी पार्किंग केल्याकर अथका पार्किंगसाठी हॉटेलच्या कर्मचाऱयाकडे दिली असेल आणि गाडी चोरीला गेली अथका तिचे काही नुकसान झाले तर त्याची नुकसानभरपाई हॉटेलला द्याकी लागेल. मात्र अशी नुकसानभरपाई देताना त्यासाठी ठोस पुराका असला पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता हॉटेल ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या