‘हाऊसफुल 5’ येतोय, अक्षयकुमारने केली घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘हाऊसफुल’ या कॉमेडी चित्रपटाच्या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 2010 साली प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल’ चित्रपट आणि त्याच्या सिक्वेलला प्रेक्षकांनी खऱया अर्थाने हाऊसफुल केले. आता लवकरच ‘हाऊसफुल 5’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने ‘हाऊसफुल 5’ ची घोषणा आज केली.   

अक्षय कुमारने  इन्स्टाग्रामवर ‘हाऊसफुल 5’ चे पोस्टर प्रदर्शित केले. तसेच 2024 च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले. ‘हाउसफुल 5’ मध्ये पाचपट जास्त वेडेपण असेल असा दावा अक्षयने केला आहे. याचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार आहेत, तर साजिद नाडियावाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.  चित्रपटात अक्षयबरोबर रितेश देशमुखही झळकणार आहे. मात्र अन्य कलाकारांबाबत अद्याप काहीच माहिती सांगण्यात आलेली नाही. 

2010 साली ‘हाऊसफुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2012 आणि 2016 साली या चित्रपटाच्या  दुसरा आणि तिसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. ‘2019’ मध्ये ‘हाऊसफुल 4’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘हाऊसफुल 5’ चे वेध लागले होते.  ‘हाऊसफुल 5’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा तोच धमाल अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.