
आजच्या धावपळीच्या जीवनात, वजनवाढीच्या समस्येने अनेकजण ग्रस्त आहेत. खूप प्रयत्न करूनही लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकत नाहीत. परंतु आपल्यासमोर असा एक कलाकार आहे, ज्याला एकेकाळी जाडा असे हिणवले जायचे. त्याने तब्बल 50 किलो वजन कमी केले आहे. त्याचे नाव आहे अर्जुन कपूर.
अर्जुन कपूर हा शाळेत असल्यापासूनच, खूप जाड होता. शालेय शिक्षणानंतर त्याला वाटले की, आता आपण वजन कमी करायला हवे. अर्जुन कपूरने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये कबूल केले आहे की, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने खूप वजन कमी केले होते. अर्जुनने तब्बल 50 किलो वजन कमी केले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरे आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की अर्जुनने इतक्या कमी वेळात इतके वजन कसे कमी केले आणि तुम्ही हे का करू शकत नाही. अर्जुन कपूरने स्वतः याचे उत्तर दिले आहे, ज्यामध्ये त्याने त्याचा संपूर्ण प्रवास कसा होता आणि त्यासाठी त्याने काय केले हे सांगितले आहे.
असा होता अर्जुन कपूरचा फिटनेस प्रवास
अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. यात त्याने सांगितले की, हे सर्व त्याच्यासाठी सोपे नव्हते. ट्रेनरसोबत तासनतास कसरत केल्यानंतर, अर्जुन कपूरने कधीही डाएटशी तडजोड केली नाही. यामुळेच त्याचे वजन कमी होऊ लागले.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूरने खुलासा केला की, त्याने चालण्यावर अधिक भर दिलेला आहे असे त्याने सांगितले.
द इंडियन एक्सप्रेसच्या मते, अर्जुन कपूरने एकेकाळी खवय्या होता. परंतु निरोगी राहण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी, त्याने जंक फूड सोडून दिले होते. केवळ ताजी फळे, भाज्या आणि उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांवरच त्याचा भर आहे. अर्जुन कपूरने शेअर केले होते की, त्याच्या नाश्त्यात अंडी ही प्रामुख्याने असतात. त्यानंतर जिमला जातो. त्यानंतर 1.30 च्या सुमारास दुपारचे जेवण करतो.
अर्जुन कपूर संध्याकाळी प्रामुख्याने आहारामध्ये टर्की सुशी घेतो. यामध्ये ऊर्जा, प्रथिने, कार्ब्स आणि फायबर जास्त असते. त्यानंतर तो जिमला जातो. 2024 मध्ये अर्जुनला थायरॉइडचे निदान झाले होते. ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे, यामुळे चयापचय मंदावून वजन वाढते. त्यामुळेच अर्जुन कपूरने 50 किलोपेक्षा जास्त वजन कमी केले असले तरी, त्याचे वजन कमी करण्याची प्रक्रिया आजही सुरु आहे.