वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा याचं संशोधन झालं पाहिजे; संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेदांता-फॉक्सकॉन सारखा लाखोंचा रोजगार निर्माण करू शकणारा प्रकल्प महाराष्ट्राकडून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. आता राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील त्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, ‘माझं स्पष्ट मत आहे की, आपण माहिती घेतली पाहिजे की एवढा मोठा प्रोजेक्ट राज्यात येत असताना बाहेर जातोच कसा? एवढा मोठा रोजगार देत असेल तर तो महाराष्ट्रातून बाहेर का निघाला? मला मुद्दाम आठवण करून द्यायची आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना एक प्रोजेक्ट आंध्रप्रदेश किंवा गुजरातला जाणार होता. मी त्या दिवशी बसून तो फायन करून तो संभाजीनगरला आणला. मग हा ग्रुप का बाहेर गेला याचं निश्चित संशोधन होणं गरजेचं आहे. पुढे ते काय देतील तो नंतरचा प्रश्न आहे. पण इथला प्रकल्प जाता कामा नये. महाराष्ट्रातील लोकांना रोजगार मिळायला हवा’.