Tips : प्रवास करताना उलट्या, चक्करचा त्रास होतो? जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बऱ्याच जणांना कार किंवा बसमधून प्रवास करताना उलटी होणे, चक्कर येणे, घाबरल्यासारखे होणे, असे त्रास होतात. यामुळे प्रवासाचा आनंद घेता येत नाहीच, शिवाय प्रवास करणेही त्रासदायक होते. अशा वेळी काय कराल?

प्रवासात उलटी किंवा चक्कर येत असेल तर भाजलेली लवंग तोंडात ठेवून चघळत राहा. भाजलेल्या लवंगांची पावडर डबीत भरून ही डबी प्रवासावेळी सोबत ठेवू शकता. यामुळे जेव्हा प्रवास कराल आणि असा त्रास व्हायला सुरुवात होईल ही पावडर खाऊ शकाल.

लांबच्या प्रवासाला जाणार असाल तर सोबत लिंबू, मीठ आणि पाणी सोबत ठेवा. पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये मीठ घालून हे पाणी प्या. यामुळे त्रास होणार नाही.

प्रवासात आंबट फळे किंवा आंबट फळांचा ज्यूस सोबत ठेवा. जेव्हा उलटी, चक्कर आणि घाबरल्यासारखे होईल तेव्हा ही फळे खा किंवा ज्यूस प्या. यामुळे आराम मिळेल.

प्रवासाला निघत असाल तेव्हा आल्याचा तुकडा कापून तो तोंडात चघळत राहा. प्रवासाला निघाल्यापासून प्रवास संपेपर्यंत कायम तोंडात आल्याचा तुकडा चघळत राहिल्यास उलट्यांचा त्रास होत नाही.

पुदिन्याची गोळी किंवा पुदिन्याचे सरबत प्रवास करताना सोबत ठेवू शकता. जेव्हा उलटी, चक्क आल्यासारखे वाटेल तेव्हा तेव्हा पटकन पुदिन्याची गोळी खाऊ शकता किंवा सरबत पिऊ शकता.