विश्रांती घेऊनही थकायला होते आहे..?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
झोप पूर्ण होते.. विश्रांती घेतली जाते तरीही कामाला उत्साह वाटत नाही.. शरीरात ताकद राहत नाही.. असे का.. यावर काही उपाय पाहूया.
  १) भरपूर पाणी प्या – कामाच्या गडबडीत, इतर काही कारणांमुळे सलग अनेक तास पाणी प्यायले जात नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की दमल्यासारखे वाटू लागते. शरीर नेहमीपेक्षा कमी काम करते. स्नायूंमध्ये ताठरता येते. त्यामुळे वरचेवर पाणी पीत राहावे.
    २) प्रमाणात चहा किंवा कॉफी घ्या – ही उत्साहवर्धक पेये आहेत. दिवसातून एकदा किंवा दोनदा याचे सेवन करा. यामुळे मेंदूला तरतरी येते.
 ३) न्याहारी करा. – दिवसभरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे न्याहारी. दिवसाची सुरुवात पोषणयुक्त मजबूत न्याहरीने करा. यामुळे  दिवसभर उत्साह राहतो.  डोकेदुखी होत नाही. उलट डोके शांत राहते. तसेच आपल्या जेवणाच्या वेळाही तंतोतंत पाळा. कारण भूक लागून गेली की त्यामुळेही थकवा जाणवतो.
४) जेवणाचे प्रमाण – तुडूंब पोट भरून खाऊ नका. त्यामुळे आळस येतो. कार्यक्षमता कमी होते. एकदाच खूप खाऊन घेण्यापेक्षा दिवसातून 2-३ तासांनी सहा वेळेला खा. त्यामुळे पोट भरलेले राहते.
 ५) व्यसनांपासून लांब राहा. – धुम्रपान, मद्यपान अशा व्यसनांपासून कटाक्षाने लांब राहा. या गोष्टींमुळे आपली कार्यक्षमता कमी होते. नाही ते विकार मागे लागतात.
 ६) शारीरिक हालचाली वाढवा. – आपले कार्यालयीन काम हे बैठे असते. कितीही ठरविले तरी एकाच जागी तासनतास बसून काम केले जाते. त्यामुळे mental fatigue येतो. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा तास स्वत:साठी वेळ काढा. मोकळ्या हवेत चालायला जा. व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करा. यामुळे उर्जा वाढते.
 ७) छंद जोपासा – आवडीचा छंद जोपासा. वाचन करा, संगीत ऐका, शिका. एखादा खेळ शिकून घ्या. चित्र काढा. Me Time खूप महत्वाचा असतो.