भांड्यांचा चिकटपणा घालवण्यासाठी…  हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर थोडेसे मसालेदार अन्न कढईत किंवा एखाद्या भांड्याच्या तळाशी चिकटले तर संपूर्ण भांडे तासन्तास घासावे लागते.

तर हा चिकटपणा त्वरित साफ करायचा असेल तर व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घ्या, त्यात बेकिंग सोडा आणि मीठ टाका.

आता हे मिश्रण भांड्यावर लावा आणि बाजूला ठेवा.

थोड्या वेळाने भांडे स्क्रबरने स्वच्छ केले तर ते त्वरित स्वच्छ होईल.

नॉनस्टिक भांड्यांचा चिकटपणा काढण्यासाठी टूथपेस्टचा वापर करू शकतो.