असं झालं तर… एसीमधून सतत पाणी टपकतंय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 उन्हाळय़ात एसीमधून पाणी टपकणे ही सामान्य समस्या आहे. ड्रेन पाईप ब्लॉक असणे, फिल्टर खराब असणे किंवा कॉइलवर बर्फ जमणे हे यामागे कारण असू शकते.

2 अनेकदा लोक एसीमधून येणाऱ्या पाण्याकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र वेळीच लक्ष न दिल्यास एसी पूर्णपणे खराब होऊ शकतो.

3 एसी फिल्टर साफ नसेल तर हवेचा प्रवाह थांबून कॉइलवर बर्फ जमा होतो. एसी किंचित झुकला असेल तर पाण्याचा निचरा होत नाही आणि टपकू लागते.

4 एसी बंद करा, फिल्टर काढून स्वच्छ करा, ड्रेन पाईप हलके स्वच्छ करा, इनडोअर युनिट सरळ करा. समस्या कायम राहिल्यास मेकॅनिकला बोलवा.

5 पाणी जास्त येत असेल, एसीमधून दुर्गंधी येत असेल, एसी थंड होत नाही, गॅस गळतीचा संशय आहे तर ताबडतोब एसी बंद करून सर्व्हिस सेंटरला फोन करा.