
उन्हाळ्यात कोथिंबीर किंवा पालेभाज्या लवकर सुकू नयेत, जास्त काळ ताज्या राहव्यात म्हणून ओल्या सुती कापडात गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे त्यातील ओलावा टिकून राहतो आणि भाजी लवकर वाळत नाही.
पालेभाज्या आणल्यानंतर लगेच धुऊ नका. भाजी निवडून प्लास्टिकच्या पिशवीऐवजी हवाबंद डब्यात किंवा जाळीदार पिशवीत ठेवा. भाज्या थेट उन्हात येणार नाहीत किंवा गॅलरीच्या खिडकीत राहणार नाहीत याची काळजी घ्या.



























































