Cutlet Recipe – चविष्ट कच्च्या केळ्याचे क्रिस्पी कटलेट बनवुन तर बघा, बच्चेकंपनीही आवडीने खातील

लहान मुलांना घरी असताना काहीतरी वेगळं चटपटीत चविष्ट खायची इच्छा कायम होते. अशावेळी आईला प्रश्न पडतो नेमकं करायचं काय? लहानमुलांसाठी पौष्टिक पदार्थ म्हणून कच्च्या केळ्याचे कटलेट हा एक उत्तम पर्याय आहे. कच्ची केळी ही आपल्यासाठी आरोग्यवर्धक मानली जातात. हेच कटलेट थोडे चटपटीत बनवल्यास, मुलेही हे केळ्याचे कटलेट आवडीने खातील. मुख्य म्हणजे हे कटलेट डब्यातील खाऊ म्हणून पण मुलांना देता येतील असेच आहेत.

कच्च्या केळ्याचे कटलेट

साहित्य
3- कच्ची केळी

2 हिरव्या मिरच्या

1 इंच लांब आल्याचा तुकडा

1/4 कप हिरवा मटार (उकडवून घ्यावा)

1 चिमूटभर हिंग

1/4 चमचा लाल मिरची पावडर

1/2 चमचा गरम मसाला पावडर

1/4 चमचा सुक्या आंब्याची पावडर

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

1/2 कप कुस्करलेल्या शेवया

कृती

कच्च्या केळ्याचे कटलेट बनवण्यासाठी, प्रथम कच्ची केळी उकडवुन घ्यावी, त्यानंतर सोलून घ्या. थंड झाल्यानंतर केळी चांगली मॅश करुन घ्यावी. मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, आले आणि वाटाणे घालुन चांगली पेस्ट करा. त्यानंतर ही पेस्ट मॅश केलेल्या केळ्यांमध्ये घालावी. एका भांड्यात हिंग, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, आमसुल तसेच मीठ घालावे हे मिश्रण केळ्याच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करावे.

Shahi Paneer Recipe – रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी शाही पनीर बनवा घरच्या घरी, पाहुणेही विचारतील याची रेसिपी

आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. केळीचे मिश्रण एका भांड्यात घ्या आणि त्यातून टिक्की किंवा कटलेटचा आकार बनवा आणि एका प्लेटमध्ये ठेवा. आता एका प्लेटमध्ये कुस्करलेल्या शेवया ठेवा. आधीच तयार केलेले कटलेट शेवयांमध्ये घालावे. त्यामुळे या कटलेटला शेवया चांगल्या पद्धतीने चिकटतील. आता केळीचे हे कटलेट गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळावे. हे कटलेट तुम्ही हिरव्या चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता.