
उन्हाळा सुरू होताच रेफ्रिजरेटरचा वापर वाढतो. अन्नपदार्थ उन्हाळ्यात लवकर खराब होऊ नये म्हणून फ्रीज अतिशय उपयुक्त आहे. मात्र, योग्य काळजी न घेतल्यामुळे फ्रीजमधून कुबट वास येतो. दुर्गंधी टाळण्यासाठी फ्रीजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पदार्थ ठेवू नका. त्यामुळे फ्रीजच्या थंड करणाऱ्या यंत्रणेवर ताण पडतो. फ्रीज संपूर्ण रिकामा करून नियमितपणे स्वच्छ पुसून घ्या. दरवाजावरील रबरदेखील स्वच्छ करा. त्यानंतर फ्रीजमध्ये एका वाटीत बेकिंग सोडा घालून ठेवा.































































