या सरकारच्या कामाविषयी कसे बोलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिथं कामगिरी असते तिथे मूल्यमापन केले जाते, या सरकारने काही कामच केलेलं नाही तर मी त्याविषयी कसे बोलणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दोन वर्षे झाल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आज निवडणुका झाल्यास पुन्हा एकदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकेल, असा निष्कर्ष समोर आला असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी अद्याप या सर्वेक्षणाचे आकडे पाहिलेले नाहीत. मात्र तुम्ही जे सांगत आहात त्यानुसार आजही भाजप हाच राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरत आहे, याबाबत आनंद आहे.