
केसगळती आणि केसांमध्ये कोंडा होणे हे आता सर्वसामान्य झालेले आहे. केसगळतीवर आपल्या किचनमधील हळदही खूप प्रभावी मानली जाते. केसगळतीमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. म्हणूनच केसगळती आणि कोंड्यावर हळद ही खूप प्रभावी मानली जाते.
हळदीमध्ये असलेले गुणधर्म शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. याशिवाय त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही हळदीचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी केसांना हळद लावली आहे का? नसेल तर त्याचे फायदे जाणून घेतल्यास त्याचा नक्कीच उपयोग होईल. होय, केसांवर हळद लावल्याने कोंडा, केस पांढरे होणे, केस गळणे अशा अनेक समस्यांवर मात करता येते.
केसांना हळद लावल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केसगळतीची समस्या दूर होते. यासोबतच नवीन केसांची वाढही चांगल्या पद्धतीने होते. हळदीमध्ये अँटी डँड्रफ गुणधर्म असतात, जे केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात.
केसांना खोबरेल तेलात हळद लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे टाळूवरील जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
दिवसभर उर्जावान राहण्यासाठी आहारात ‘हा’ पदार्थ समाविष्ट करायलाच हवा, वाचा
पांढरे आणि खराब झालेल्या केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी हळदीचा वापर केला जाऊ शकतो. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे अँटीऑक्सिडेंट असते, ज्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. तसेच, ते केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
केसांना हळद लावण्यासाठी 1 वाटी खोबरेल तेल घ्या. आता या तेलात १ चमचा हळद मिसळा. हे तेल नियमितपणे लावल्याने खूप प्रभावी परिणाम मिळू शकतात. याशिवाय केसांवर हळदीचा हेअर मास्कही लावू शकता. हळद केसांचा मास्क तयार करण्यासाठी, 1 अंडे घ्या. आता त्यात २ चमचे मध आणि २ चमचे हळद मिसळा. आता हा पॅक केसांच्या मुळांवर आणि टोकांना लावा. हेअर पॅक सुमारे 15 ते 20 मिनिटे कोरडे होऊ द्या. त्यानंतर ते धुवा. यामुळे केसांची चांगली वाढ होईल. याशिवाय केसांची चमकही वाढू शकते.