असं झालं तर… घरबसल्या आधार कार्डावरील पत्ता अपडेट करा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aadhar card

रहिवासाचा अधिकृत पुरावा नसल्यास आधार अपडेट करणे कठीण जाते, पण यूआयडीएआयच्या ‘हेड ऑफ फॅमिली’ फीचरमुळे हे सोपे झाले आहे.

जर तुम्ही तुमच्या पालकांसोबत किंवा जोडीदारासोबत राहात असाल तर तुम्ही त्यांच्या आधार कार्ड पत्त्याच्या आधारे तुमचा पत्ता बदलू शकता.

आधार अॅप डाऊनलोड करून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. आधार अॅपमध्ये ‘सर्व्हिसेस’ सेक्शनमध्ये जा आणि ‘अॅड्रेस अपडेट’वर क्लिक करा.

कुटुंबाच्या प्रमुखाचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा. त्यांच्याशी असलेले आपले नाते (उदा. वडील, पती, पत्नी इत्यादी) निवडा. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

सर्वात शेवटी कुटुंबप्रमुखाला त्याच्या आधार अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल. ‘मेंबर रिक्वेस्ट’ ‘अप्रूव्ह’ करावी लागेल. त्यानंतर पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.