साबण वापरताना तुम्ही ही करता या चुका?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंघोळ करताना शरीराची स्वच्छता करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारचे साबण वापरले जातात. परंतु काहीवेळा साबण वापरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्या त्वचेवर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. तेव्हा साबणाचा वापर करताना कोणत्या गोष्टी करणे टाळाव्यात आणि साबण वापरण्याची योग्य पद्धत कोणती हे जाणून घेऊयात.

साबण वापरण्याची योग्य पद्धत
1) साबण थेट त्वचेवर चोळण्याएवजी बाजारात मिळत असलेल्या सॉफ्ट ब्रशचा उपयोग करा. यामुळे साबणाचा तुमच्या त्वचेशी थेट संपर्क येणार नाही.

2) आपल्याला शरीराच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत साबण लावण्याची सवय असते पण ही सवय चूकीची आहे. तेव्हा नेहमी साबण शरीराच्या खालच्या भागापासून वरच्या भागाला लावला पाहिजे.

3) साबणाचा जास्त फेस काढणं योग्य नाही. साबणाचा जास्त फेस काढल्यामुळे त्वचेचे नुकसान होते.

4) साबण कमी केमिकल्स असलेला आणि माईल्ड असलेला वापरा. यामुळे सेन्सेटीव्ह त्वचेला इजा पोहचत नाही.

5) साबणाने हात कमीतकमी 20 सेकंद धुवा.

6) साबण वापरल्यानंतर सुका करून ठेवावा. कारण त्यात पाणी राहीले तर साबणाला मॉईश्चर पकडून त्यावर जंतू निर्माण होतात.

7) साबणाने चेहरा कोरडा पडतो. तसेच केमिकलयुक्त साबण लावल्याने त्वचेला अॅलर्जी होऊ शकते. त्याऐवजी चेहऱ्याला स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक फेसवॉश वापरावा ज्यामुळे तुमच्या त्वचेला अपाय होणार नाही