
ऋतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणीच्या ‘वॉर 2’ ची चर्चा आहे. 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला दमदार कमाई केली. पाच दिवसांत हा चित्रपट 300 कोटींच्या पार गेला आहे. आता ‘वॉर 2’चा दुसरा आठवडा सुरू आहे. सोमवारी चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 7.50 कोटी रुपये कमावले. ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरची केमिस्ट्री, कियाराचा लक्षणीय अभिनय आणि दमदार अॅक्शन यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.