कंगनासोबतचा ई-मेल वाद; अभिनेता हृतिक रोशनचा जबाब नोंदवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
क्रिश-3 च्या सेटवर कंगनाचे हृतिकसोबत सूत जुळले होते. हृतिकने कधीच ते मान्य केले नाही तर कंगनाने मात्र कंगनाने कायम त्यांचे अफेयर असल्याचे सांगितले आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील ई-मेल वाद प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने नव्याने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सीआययू पथकाने आज हृतिकचा जबाब नोंदवून घेतला.

हृतिकने आपल्याला काही खासगी व रोमँटिक ई-मेल पाठवल्याचा आरोप कंगनाने केला होता. त्यावरून वादाची ठिणगी पेटली आणि वाद चांगलाच चिगळला. त्यावेळी हृतिकने सर्व आरोप फेटाळत कंगनाला आव्हान दिले होते. कंगनानेच मला असंख्य ई-मेल पाठविल्याचा आरोप करीत हृतिकने पोलिसांत तक्रार दिली होती. त्याच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र 2016 पासून तो तपास थांबला होता. आता गुन्हे शाखेच्या सीआययू पथकाने हा तपास नव्याने सुरू केला. आपला जबाब नोंदविण्यासाठी हृतिकला समन्स बजावले होते. त्यानुसार जबाब नोंदविण्यासाठी हृतिक रोशन आज पोलीस मुख्यालयात आला होता.