हृतिका सरदेसाईची पॉवरलिफ्टिंगच्या ‘वर्ल्डकप चॅम्पियन’साठी निवड

26

सामना ऑनलाईन | मुंबई

नुकत्याच आंध्र प्रदेशमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत किशोरी गटात महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी अव्वल दर्जाची खेळाडू हृतिका संजय सरदेसाई हिची २ ते ८ सप्टेंबर २०१८ या कालावधीत दक्षिण आफ्रिका येथे पार पडणाऱया वर्ल्डकप चॅम्पियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तिने नुकत्याच आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम येथे पार पडलेल्या किशोरी ६३ वजनी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेत ३४५ किलो वजन उचलत कर्नाटकाची रेनिझिया कार्लो (३०५ ) आणि तेलंगणाची एम प्रिया (३००) या दोघी अव्वल दर्जाच्या खेळाडूंशी टक्कर देत महाराष्ट्राला स्पर्धेतील एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले.

परळ येथे राहणाऱया हृतिकाने आंतरशालेय, महाविद्यालयीन स्पर्धेतही आपल्या खेळाची चमक दाखवली आहे. तिचा भाऊ पुष्कराज याने आंध्र प्रदेशातीलच श्रीकाकुलम येथील किशोर गटाच्या पॉवर लिफ्टींग राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले आहे. तर तिचे छत्रपती पुरस्कार विजेते पिता संजय सरदेसाई पॉवरलिफ्टींगमध्ये निष्णात प्रशिक्षक आहेत. निवडीबद्दल सर्व थरातून तिचे कौतुक होत आहे

आपली प्रतिक्रिया द्या