
राज्यात सलग तेराव्या वर्षी कोकण बोर्ड अव्वल ठरले आहे. कोकण बोर्डाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिह्याचा निकाल 95.67 आणि सिंधुदुर्ग जिह्याचा 98.74 टक्के निकाल लागला आहे. कोकण बोर्डातून परीक्षेला 23 हजार 563 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 22 हजार 797 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून 98.03 टक्के प्रमाण उत्तीर्ण होण्याचे आहे.
नाशिक सातव्या क्रमांकावर
नाशिक ः नाशिक विभागाचा निकाल हा 91.31 टक्के लागला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये नाशिक सातव्या स्थानी आहे, तर विभागातील चार जिह्यांमध्ये नाशिक जिल्हा अव्वल स्थानी आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिह्यांमधून एकूण 1 लाख 57 हजार 842 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 1 लाख 44 हजार 136 उत्तीर्ण झाले आहेत.
‘लातूर पॅटर्न’ खालून पहिला
लातूर ः महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवणाऱया ‘लातूर पॅटर्न’ला घरघर लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून लातूर विभागाच्या निकालात सातत्याने घसरण होत आहे. बारावीच्या निकालातही लातूर राज्यात खालून पहिल्या क्रमांकावर आले आहे. विभागाचा निकाल 89.46 टक्के लागला असून त्यातही लातूर जिल्हा शेवटच्या क्रमांकावर असून धाराशीव जिल्हा अव्वल आला आहे.