
सामना प्रतिनिधी, मुंबई
जेईई, नीट परीक्षांच्या धर्तीवर बारावीचा सायन्स शाखेचा बदललेल्या पेपरपॅटर्नमुळे यंदा बारावीचा निकाल घसरणार असल्याची चर्चा शिक्षकवर्तुळात सुरू आहे. सरावासाठी म्हणून गेल्या वर्षी अकरावीपासूनच विद्यार्थ्यांना पर्यायी प्रश्न नसलेली (Optional Question) प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र ही प्रश्नपत्रिका सोडविताना अकरावीतच अनेकांची दांडी गुल झाली. अकरावीत ग्रेस मार्प मिळवून बारावीत आलेले विद्यार्थी बोर्डाच्या या नव्या प्रश्नपत्रिकांमुळे तणावाखाली आहेत.
इंजिनीयरिग आणि मेडिकल प्रवेशासाठी देशपातळीवरील होणाऱया जेईई आणि नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी गेल्या वर्षी अकरावी आणि यंदा बारावीसाठी कॉब्सेकडून प्रश्नपत्रिकांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणिताच्या प्रश्नपत्रिकेत एपूण 29 प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचेच आहेत. या प्रश्नपत्रिकेत पूर्वीप्रमाणे प्रत्येक प्रश्नाला पर्यायी प्रश्न नसल्याने विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे लिहिणे आवश्यक आहे.
प्रत्येक प्रश्नाला पर्यायी प्रश्न देण्याची मागणी
विज्ञान आणि गणिताच्या प्रत्येक प्रश्नाला पर्यायी प्रश्न देण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. गेल्या वर्षी अकरावीत अनेकजण नापास झाले होते. सलग 29 प्रश्न सोडविणे विद्यार्थ्यांसाठी खूपच कठीण असून ज्या विद्यार्थी हितासाठी प्रचलित पद्धतीनुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी केली आहे.
जेईई, नीट न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे वांदे
ज्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षा द्यायची नाही अशा विद्यार्थ्यांनाही ही प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. जेईई, नीट न देणाऱया विद्यार्थ्यांसाठी वेगळी प्रश्नपत्रिका देण्याविषयी चर्चा रंगली होती. मात्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा तसा कोणताही विचार नसून बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या नमुना प्रश्नपत्रिका बोर्डाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिली.
सायन्स शाखेच्या पीसीबी/एम या प्रश्नपत्रिकेत 29 प्रश्न आहेत.
प्रश्नपत्रिकेतील 3 ते 4 प्रश्नांनाच ऑप्शनल प्रश्न दिले आहेत.
उर्वरित सर्वच प्रश्नांची उत्तरे लिहिणे आवश्यक आहे.
ऑप्शनल प्रश्नदेखील त्याच धडय़ातील असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो.
summary- hsc result may go down this year































































