‘अस्सल’ कलाकृतींची मुंबईकरांना भुरळ; 7 जानेवारीपर्यंत बीकेसीत ‘महालक्ष्मी सरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागातील आणि वेगवेगळय़ा राज्यांमधील ‘अस्सल कलाकृती’ मुंबईकरांना अनुभवता यावी यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान येथे ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ आयोजित केले आहे. 7 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये ग्रामीण कारागिरांचे काwशल्य, कारागिरांनी बनवलेल्या वस्तू एकापेक्षा एक सरस पाहायला मिळतील.

‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत स्वयंसहाय्यता गटांनी व स्वयंरोजगारींनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने पेंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या विद्यमाने हे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनातील 511 स्टॉल्सपैकी 250 स्टॉल्स महाराष्ट्रातील आहेत. तसेच मणिपूर, ओडिशा, राजस्थान, तामीळनाडू, त्रिपुरा यांसारख्या 30 हून अधिक राज्यांतील कारागीरांचे स्टॉल्स आहेत.

भरतकाम केलेल्या साडय़ा, बांबूच्या हाताने विणलेल्या वस्तू, लाकडी कोरीव वस्तू, चामडय़ाच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, कोल्हापुरी चप्पल, कॉटन शर्ट, ड्रेस मटेरियल, साडय़ा, चादरी यांसह अनेक वस्तू पाहायला मिळतील.

झुणका भाकर, वांगे भरीत, मोहा पुरणपोळी, थालीपीठ, कटाची आमटी, झणझणीत मिसळ. अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, हैदराबादी बिर्याणी, सुरमई, पापलेट, प्रॉन्स, मिरचीचा ठेचा याचा आस्वाद खवय्यांना घेता येईल.

22 प्रकारच्या शेवया

या प्रदर्शनात 22 प्रकारच्या शेवया पाहायला मिळतील. यात न्यूट्री शेवाईची उत्पादने आहेत. वेगवेगळय़ा फ्लेवरपेक्षा मिलेटच्या शेवयांना ग्राहकांची जास्त मागणी आहे. यात शेवगा, पालक, मेथी, ज्वारी, गहू, बीट, सोयाबीनच्या शेवयांचा समावेश आहे, असे श्री स्वामी स्वयंसहाय्यता महिला गटाच्या अस्मिता सूर्यवंशी या महिलेने सांगितले.

राज्य व देशाच्या ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या निर्मिती व विक्रीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे हा या प्रदर्शनामागील उद्देश आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त मुंबईकरांनी भेट द्यावी.  

– रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान