रे रोड स्थानकाजवळ मानवी सांगाडा सापडला

246

रे रोड रेल्वे स्थानकाजवळ गवतामध्ये मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तो सांगाडा केईएम रुग्णालयात नेण्यात आला असून तो पुरुष की महिलेचा हे आता तो तपासाअंती स्पष्ट होणार आहे. वडाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

रे रोड स्थानकाजवळ मोकळी जागा असून तेथे गवत वाढलेले आहे. त्या गवतात आज दुपारी मानवी सांगाडा असल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तो सांगाडा ताब्यात घेतला. तो सांगाडा कोणाचा ते जाणून घेण्यासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या