मुलीला परप्रांतात विकण्याचा ‘त्याचा’ डाव हाणून पाडला

crime

एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिची परप्रांतात विक्री करण्याचा प्रयत्न मुलीनेच हाणून पाडला. यानंतर तिने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे आरोपीला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलगी अनाथ आहे. तिची एक बहीण आधीच राजस्थानात विकली गेली आहे. सध्या आपल्या आत्याकडे वास्तव्याला असलेल्या मुलीकडे राजस्थानातील हा बहिणीचा नवरा पोचला. घरात कुणीही नसल्याचे पाहून त्याने बाबाचा प्रसाद रुपात पावडर खायला दिली. हा सर्व प्रकार लक्षात येताच अल्पवयीन मुलीने शेजा-यांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठत पोलीस तक्रार दिली. आरोपींनी फूस लावून अपहरण करण्याचा आणि परप्रांतात नेऊन विक्री करण्याचा रचलेला डाव मुलीने हाणून पाडला. आरोपीला पोलिसानी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यापूर्वी चंद्रपुरात अल्पवयीन मुलींचे अपहरण करून परप्रांतात विक्री करण्याचे मोठे रॅकेट उजेडात आले होते. या घटनेनंतर पुन्हा तशीच घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या