उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

824

नगर येथील प्रसिद्ध उद्योजक हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांची चौकशी सुरू आहे. अपहरणानंतर काही तासांतच पोलिसांनी हुंडेकरी यांची सुटका केली होती. परंतु आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते.

हुंडेकरी मोटर्स शोरूमचे संचालक हुंडेकरी यांचे अज्ञात चार जणांनी धमकावून अपहरण केले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकांनी त्यांचा शोध सुरू केला. दुपारच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली. या अपहरण नाट्यामागील आरोपींचा पोलीस शोध घेत होते. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी परतूरमधून ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या