
वीस रुपयांच्या क्षुल्लक वादातून संतप्त नवऱ्याने बायकोची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: देखिल ट्रेनसमोर जाऊन आत्महत्या केली. ही घटना पूर्व दिल्लीतील शाहदरा शहरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलवंत सिंग आणि महिंदर सिंग असे नवरा बायकोचे नाव आहे. दोघांमध्ये लहान मोठी भांडण व्हायची. बुधवारी अशाच क्षुल्लक कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. कुलवंतने महिंदरकडून 20 रूपये मागितले. तिने त्यासाठी नकार दिला. त्यामुळे कुलवंतला प्रंचंड राग आला. संतापाच्या भरात त्याने घराच्या छतावर पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि मृतदेह घरात नेला.
बुधवारी दुपारी शेजाऱ्यांनी महिलेच्या दिराला फोन करुन तिचा मृतदेह घरात असल्याचे सांगितले. त्याने लगेच पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. . पोलीस तिथे पोहोचले तेव्हा महिंदर शालमध्ये गुंडाळलेल्या अवस्थतेत पडली होती. महिंदरच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याच्या आईने आत्महत्या केली आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते. पोलिसांना मृत महिलेच्या गळ्यावर गळा दाबल्याचे वळ दिसले. तिथेच पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तातडीने तपास सुरु केला. शिवाय याच वेळेस महिंदर देखील घरात नसल्याने पोलिसांनी त्याची शोधाशोध केली. तेव्हा तो रेल्वे रुळांवर बसलेला पोलिसांना दिसला. पोलिसांना पाहून तो रुळांवर पळू लागला. अटकेच्या भीतीने त्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारली. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित केले. या घटनेनेनंतर कुलवंत आणि महिंदरच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






















































