नोकरीवरून कमी करण्याच्या भीतीने आयटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादमध्ये आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोगकु हरिणी असे तिचे नाव आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना डिसेंबरमध्ये नोकर कपात करणार असल्याची नोटीस पाठवली होती. त्यात पोगकुचेही नाव होते. यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीने पोगकु निराश झाली होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली. दरम्यान, पोगकुने आत्महत्येआधी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांना सापडली आहे.

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोगकु मूळची महबूबनगर जिल्हयातली होती. गेल्या दीड वर्षांपासून ती एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत होती. कंपनीने पाठवलेल्या नोकर कपातीच्या नोटीसमध्ये स्वत:चे नाव बघून तिला धक्का बसला होता. यातूनच तिने स्वत:ला संपवले.