
संपूर्ण देशाला हादरवणारे दिशा सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरण ताजे असतानाच हैदराबाद मध्ये पुन्हा एका तरुणीवर (18) बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणी व तिची बहीण (10) रस्ता चुकल्या होत्या. याचाच गैरफायदा घेत रिकशाचालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना 8 डिसेंबरला रात्रीच्या वेळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणी आपल्या दहा वर्षाच्या बहिणीबरोबर जात होती. पण त्या रस्ता auto driver, चुकल्या. यामुळे दोघी घाबरल्या होत्या. घरी कसे पोहचायचे याची चिंता त्यांना सतावत होती. यामुळे त्यांनी तिथे उभे असलेल्या एका रिकशावाल्याला याबद्दल विचारले. त्याने गोड बोलत पीडितेकडून तिची संपूर्ण माहिती काढली. त्यानंतर मी तुम्हाला घरी सोडतो असे सांगत त्याने दोघींना रिक्शात बसण्यास सांगितले. रिकशावाला चांगली व्यक्ती असल्याचे समजून दोघीही निश्चिंत होत्या. त्यात त्याने वाटेत काम असल्याचे भासवत पीडित तरुणी व तिच्या बहीणीला रिक्शातून उतरवले व नामपल्ली भागातील लॉजवर त्यांना आणले. तिथे त्याने तरुणीवर बलात्कार केला व तो पळून गेला.
























































