मातीशिवायही शेती शक्य; घराच्या बाल्कनीत, टेरेसवर कसा पिकवाल भाजीपाला? जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेती म्हटले की माती हवीच. परंतु सध्या वाढती लोकसंख्या आणि खतांचा वापर यामुळे शेतीयोग्य जमिनही कमी पडू लागली आहे. त्यामुळे संशोधक नवनवीन तंत्रज्ञान साध्य करण्यासाठी प्रयोग करत आहेत. यातीलच एक म्हणजे मातीशिवाय शेती. हो, मातीशिवायही शेती शक्य असून घराची बाल्कनीमध्ये, अंगणात किंवा टेरेसवरही तुम्ही हायड्रोपोनिक फार्मिग (Hydroponic Farming) तंत्रज्ञानाद्वारे भाजीपाला पिकवू शकता. बऱ्याच देशांमध्ये हा प्रयोग यशस्वी देखील झाला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे रोप लावण्यापासून ते फळधारणा होईपर्यंत याच मातीची गरजच भासत नाही.

भोपाळमध्ये राहणारी साक्षी भारतद्वाज मायक्रो बायोलॉजीमध्ये पीएचडी करत आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती कशी करावी यावर ती रिसर्च करत आहे. सध्या शेतीमध्ये अनेक प्रकारच्या खतांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा भाज्यांच्या आणि फळांचा आपल्या शरिरावर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत हायड्रोपोनिक फार्मिंग हा एक चांगला पर्याय असून घरच्या घरी भाजीपाला, फळं पिकवता येतात. या भाज्या ऑर्गेनिक असतात आणि पौष्टीकही, असेही ती म्हणाली.

हायड्रोपोनिक फार्मिंगसाठी जास्त जागेची आवश्यकताही नसते. फक्त आपल्या गरजेप्रमाणे सेटअप तयार करून घ्यायचा. एक किंवा दोन प्लांटद्वारेही तुम्ही भाजीपाला पिकवू शकता. यात पालक, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिर्ची, टॉमॅटो, कोथिंबीर, वांगी यासह अन्य भाज्यांचेही उत्पन्न घेऊ शकता.

हायड्रोपोनिक म्हणजे काय?

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता येणारी शेती ही माती विना केली जाते. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकतत्वे पाण्याच्या साहाय्याने दिले जातात. यालाच हायड्रोपोनिक असे म्हणतात.

कोणत्या पद्धतींचा वापर?

हायड्रोपोनिक फार्मिंगमध्ये अॅब अँड फ्लो, पद्धत वापरली जाते. शेतीसाठी टाकीवर ट्रे किंवा टबची रचना केलेली असते. त्यामध्ये पोषक अन्नद्रव्ययुक्त द्रव सोडले जातात. यातून पिके त्यांच्या गरजेनुसार पोषक अन्नद्रव्ययुक्त घेतात आणि रोपांची वाढ होते. यासह एरोपोनिक तंत्रही यासाठी वापरले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by JungleVase 🍀 (@jungle_vase)