
वाढत्या महागाईचा फटका कार निर्मिती क्षेत्रालाही बसत आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने विविध खर्चांमधील वाढीचे कारण देत पुढच्या महिन्यापासून आपल्या सर्व गाड्यांच्या किमती १ टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे बुधवारी जाहीर केले.
कंपनीने एका रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये माहिती दिली की, मे २०२६ पासून लागू होणाऱ्या या दरवाढीअंतर्गत सर्व मॉडेल्सच्या किमती १ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खर्चात झालेली विविध प्रकारची वाढ हे या दरवाढीचे मुख्य कारण असल्याचे कंपनीने स्पष्ट केल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.




























































