
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्यापार करार कोणत्यातरी अनामिक भीतीपोटी केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. कलेत जगभरात धुमाकूळ घातलेल्या एपस्टिन फाईल्समध्येही मोदींचे नाव आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्य्क्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘मला मोदींची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायची नाही,, असे यात ट्रम्प म्हणताना दिसत आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनीही हा व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
प्रशांत भूषण यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर डोनाल्ड ट्रम्प यांचा 10 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘यात ट्रम्प प्रभावीपणे म्हणत आहेत की, मोदींचे माझ्यावर प्रेम आहे, कारण मी त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू शकतो! याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की, ट्रम्प यांच्या मते पंतप्रधान मोदींची त्यांच्याशी असलेली मैत्री ही केवळ प्रेमापोटी नसून, त्यामागे एक प्रकारचा दबाव किंवा भीती आहे’, असे कॅप्शन प्रशांत भूषण यांनी दिले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Trump is effectively saying that “Modi loves Trump, because I can destroy his political career”!
What does this mean?
It can only mean that Modi is forced to love Trump because Trump has something which if revealed, would destroy Modi’s political career.#EpsteinFiles pic.twitter.com/60F2e67FX9— Prashant Bhushan (@pbhushan1) February 9, 2026
ट्रम्प नक्की काय म्हणाले?
मोदी हे थोर व्यक्ती असून त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मला असे वाटत नाही की तुम्ही प्रेम या शब्दाचा कोणताही वेगळा अर्थ काढावा. मला त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायची नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी हे विधान केले.
व्हिडीओ गतवर्षीचा, पण…
दरम्यान, हा व्हिडीओ गेल्या वर्षातील असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र आता हिंदुस्थान-अमेरिका व्यापार आणि एपस्टिन फाईल्सचा मुद्दा गाजत असताना हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
एपस्टिन फाइल्समध्ये मोदींचे नाव, इस्रायलमध्ये नाचल्याचा आणि गायल्याचा काँग्रेसचा दावा


























































