
मी मध्यरात्री दोनपर्यंत काम करत असतो, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. माधव जामदार यांनी निकालपत्रातच कामाचा तपशील दिला.
एका मंदिर ट्रस्टच्या नोंदणीबाबत न्या. जामदार यांनी तब्बल 66 पानी निकाल दिला. या निकालपत्रात त्यांनी त्यांची कार्यप्रणाली नमूद करत संपूर्ण दिनक्रम मांडला आहे.
मी कोर्टाच्या कामाची वेळ संपल्यावर दोन ते अडीच सुनावणी घेतो. नंतर चेंबरमध्ये रात्री साडेदहा साडेअकरापर्यंत दैनंदिन ऑर्डर कॉपीवर सही करणे व दुरुस्तीचे काम करतो. मग घरी गेल्यावर मध्यरात्री दोनपर्यंत याचिकांचे वाचन करतो. सकाळी कोर्ट सुरू होण्याआधी एक तास पुन्हा कागदपत्रांचे वाचन असते व नंतर कोर्टात सुनावणी सुरू होते. त्यामुळे निकालपत्र देण्यास उशीर होतो, असे न्या. जामदार यांनी निकालपत्रात म्हटले आहे.


























































