आयबी कर्मचारी हत्या प्रकरण, ताहिर हुसैनला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली हिंसाचारातील आरोपी आम आदमी पार्टीचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन याला गुरुवारी दुपारी दिल्ली पोलिसांच्या क्राईम बँचने अटक केली. हुसैन हा आठवडाभर फरार होता. त्याच्या विरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. ‘आयबी’चे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येचाही आरोप आहे. त्याच्या अटकेमुळे हिंसाचारामागील बऱयाच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

हुसैनने तपासाला सहकार्याची तयारी दाखवत शरणागतीसाठी याचिका केली होती. तथापि, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. पोलिसांनी हुसैनला अटक करावी, असेही आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँच पथकाने हुसैनला अटक केली. दरम्यान, दिल्लीत घडलेल्या हिंसाचारातील बळींची संख्या 53 वर पोहोचली आहे.