
कोलंबोमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान या बहुप्रतिक्षित सामन्याला काही वेळात सुरुवात होणार आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल पाकिस्तानने जिंकला असून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून हिंदुस्थानचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी संघात दोन बदल करण्यात आले असून अर्शदिप सिंग आणि संजू सॅमसन यांना या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी कुलदीप यादव आणि विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे.
टीम इंडियाचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरून चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
Here’s how #TeamIndia lineup for our 3️⃣rd match of #T20WorldCup 2026! 🙌
Updates ▶️ https://t.co/IgYYH0TeR9#MenInBlue pic.twitter.com/0VHSdlSYxl
— BCCI (@BCCI) February 15, 2026
पाकिस्तानचा संघ
सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (यष्टीरक्षक), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान तारिक
























































