ICC T20 World Cup – शून्याचं ग्रहण सुटेना! अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनची वर्णी लागणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा आक्रमक आणि विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माकडून संघासह देशाला भरपूर अपेक्षा आहेत. मात्र, त्याची गोलंदाजांवर तळपणारी बॅट मागील काही दिवसांपासू शांत झाल्याने टीम इंडियाच्या गोटात धडधड वाढली आहे. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा हा धुरंधर मागील तिन्ही सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे आता त्याच्या संघातील स्थानावर प्रश्चचिन्ह निर्माण केलं जात आहे.

एक लाजीरवान्या विक्रमाची नोंद अभिषेक शर्माच्या नावावर झाली आहे. प्रथम अमेरिका नंतर पाकिस्तान आणि आता नेदरलँडविरुद्ध तो शून्यावर बाद झाला आहे. सलग तीन सामन्यांमध्ये शून्यावर बाद होणारा अभिषेक शर्मा हिंदुस्थानी क्रिकेटमधला पहिला फलंदाज ठरला आहे. तर टी-20 वर्ल्डकपमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये शून्यावर बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.  सर्वात प्रथम हा लाजीरवाना विक्रम युगांडाच्या रॉगर मुकासाने केला होता. अभिषेक शर्माच्या सुमार खेळावर आणि संघातील स्थानावरून आता सोशल मीडियावर उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. संजू सॅमसन सध्या तंबूत बसून मैदानात उतरण्याच्या प्रतिक्षेत आहे. दुसरीकडे संधी मिळूणही अभिषेक शर्मा लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. त्यामुळे आता सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळते का? हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

ICC T-20 World Cup – आता खरा धुरळा उडणार! सुपर-8 चं शेड्युल जाहीर, जाणून घ्या टीम इंडियाच्या लढती