
‘टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी आमचा संघ पूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे विजेतेपद पटकावताना अब्जावधी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींची मनं दुखावली तरी आम्हाला त्याची पर्वा नाही,’ असे ठाम शब्दांत सांगत अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने हिंदुस्थानला उघड आव्हान देत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. सँटनर म्हणाला, ‘विजेतेपद मिळवण्यासाठी आमचा संघ पूर्ण तयारीत आहे. स्पर्धेत आम्ही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. काही छोटय़ा चुका दुरुस्त केल्या, तर आम्ही निश्चितच विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर राहू.’






























































