आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा – हिंदुस्थानी संघाचा आज इंग्लिशचा पेपर!

आयसीसी महिला वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता रोमांचक टप्प्यावर पोहोचलीय. यजमान हिंदुस्थानी महिला संघाची आता ‘जिंका किंवा बॅगा भरा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. मात्र, स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी हिंदुस्थानी महिलांना इंग्लिशचा पेपर सोडवावा लागणार आहे.

हिंदुस्थानची सर्वांत मोठी ताकद म्हणजे स्पिन जोडी दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा. होळकर स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असून, जसजसा सामना पुढे सरकेल, तसतसे फलंदाजांना खेळणे कठीण होईल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. इंग्लंडचा संघ अद्यापि या स्पर्धेत अपराजित आहे. मात्र, त्यांच्या मधल्या फळीतील सातत्यावर प्रश्नचिन्ह आहे.

उभय संघ –

हिंदुस्थान – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गोड, श्री चरणी.

इंग्लंड – नेट स्किव्हर ब्रंट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स (यष्टीरक्षक), हीदर नाइट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, चार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन सारा ग्लेन, एम्मा लॅम्ब, लिसी स्मिथ.