भावा, तू आमच्याकडून खेळ! निवृत्तीनंतर रायुडूला ‘या’ देशाची खुली ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियाचा मधल्या फळीतील खेळाडू अंबाती रायुडू याने बुधवारी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. वर्ल्डकपच्या संघङात निवड न झाल्याने आणि दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागीही वर्णी न लागल्याने रायुडू नाराज होता अशी चर्चा आहे. याचमुळे रायुडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता निवृत्तीनंतर त्याला एका देशाने आमच्याकडून क्रिकेट खेळ अशी खुली ऑफर दिली आहे.

टीम इंडियासाठी काळा दिवस, रायुडूच्या निवृत्तीनंतर गंभीर निवड समितीवर उखडला

रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्याची आईसलँड क्रिकेट संघाने ऑफर दिली आहे. शिवाय, आईसलँड देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी कोणत्या कादगपत्रांची गरज लागते, याची माहितीही त्यांनी चक्क आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. वर्ल्डकपमध्ये चौथ्या स्थानासाठी विजय शंकरची निवड झाल्यानंतर अंबाती रायडूचे थ्री-डी गॉगलचे ट्वीट खूप गाजले होते. त्याचाच आधार घेत आईसलँड क्रिकेटने हे ट्वीट केले आहे. सोबत, संघात निवड झालेल्या मयंक अग्रवालच्या कामगिरीचाही उल्लेख केला आहे.

टीम इंडियाला इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान दुखापतीचे ग्रहण लागले. सलामीवीर शिखर धवननंतर विजय शंकरच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या समस्येत वाढ झाली. धवनच्या जागी ऋषभ पंत आणि शंकरच्या जागी मयंक अग्रवालची वर्णी लागली. परंतु रायुडूला डावलण्यात आल्याने तो नाराज झाला आणि त्याने निवृत्ती घेतली.