
येथील विकली मार्केट परिसरातील काटकर हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकून गर्भलिंग चाचणीचे मशिन जप्त केले आहे. पोलिसांनीच स्टिंग ऑपरेशन करून डॉ. काटकर दाम्पत्याचा भांडाफोड केला. दरम्यान, याच डॉक्टरवर दोन वर्षांपूर्वीही अशीच कारवाई करण्यात येत होती.
काटकर हॉस्पिटलमध्ये प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या तक्रारी आल्याने पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेऊन तयारी केली. यासाठी निर्भया पथकाच्या तेजश्री पवार व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी एका जोडप्याला काटकर हॉस्पिटलमध्ये पाठवले. डॉक्टरांनी सोनोग्राफीसाठी 21 हजार आणि गर्भपातासाठी 25 हजार रुपये अशी रक्कम घेऊन येण्यास सांगितले. बुधवारी चाचणी सुरू असतानाच पोलिसांनी या रुग्णालयावर छापा टाकून सोनोग्राफी मशिन सील केले.

























































