
व्हिडीओकॉन समूहाला बेकायदेशीर कर्ज दिल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या चंदा कोचर यांच्याकडून बोनस व इतर भत्ते परत मिळावेत यासाठी आयसीआयसीआय बँकेने हायकोर्टात नव्याने सूट दाखलकेले आहे. कोचर यांना देण्यात आलेला एप्रिल 2006 ते मार्च 2018 पर्यंतचा बोनस परत करण्यात यावातसेच कोचर यांचे निलंबन ग्राहय़ धरण्यात यावे अशी मागणी बँकेच्या वतीने करण्यात आलीआहे.आयसीआयसीआय बँकेच्या सीईओपदी असताना चंदाकोचर यांनी 2018 साली व्हिडीओकॉन समूहाला 3250 कोटींचे बेकायदेशीररीत्या कर्ज दिले होते. या कर्जामुळेचंदा कोचर यांचे पती दीपक यांना फायदा होणार होता. हा प्रकारउघडकीस येताच आयसीआयसीआय बँकेने कोचर यांची हकालपट्टी केली. 2009 ते 2018 पर्यंतचे त्यांना देण्यात आलेले आर्थिक रोखेआणि भत्तेही रोखण्यात आले. एवढेच काय तर 7.4 कोटींचा बोनसही परत करण्याचे आदेश त्यांना बँकेने दिले होते. आपल्यावर करण्यात आलेली ही कारवाई चुकीचीअसल्याचा दावा करत कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असतानाच आयसीआयसीआयबँकेनेही हायकोर्टात नव्याने सूट दाखल केले आहे. या संदर्भात आयसीआयसीआयच्या वतीने आज प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले त्यावरही माहिती देण्यात आली. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्तीसुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत खंडपीठाने प्रतिज्ञापत्रदाखल करून घेत या प्रकरणावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.

























































