आता नोएडाच्या डीएफएल मॉलमध्ये मादाम तुसाद म्युझियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात मेणाच्या पुतळय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या मादाम तुसाद म्युझियम मंगळवारपासून नोएडाच्या सेक्टर-18 मधील डीएफएल मॉलमध्ये सुरू झाले. यामध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यापासून मिल्खा सिंह, कपिल देव आदी विविध क्षेत्रांतील 50 दिग्गजांचे मेणाचे पुतळे आहेत. हे म्युझियम म्हणजे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांचे आकर्षण ठरेल, असा विश्वास म्युझियम व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.