दहा रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील, पालिकेची सुधारित नियमावली जाहीर

1048

कोरोना रुग्णवाढ रोखण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून दहापेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंटेंन्मेंट झोनबाबाब पालिकेने नवीन सुधारित नियमावली जाहीर केली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज बोलावलेल्या विशेष बैठकीत नियमाच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश प्रशासनाला दिले.

झोपडपट्टीपेक्षा इमारतींमध्येच प्रसार जास्त
– मुंबईत सद्यस्थितीत झोपडपट्टीपेक्षा इमारतींमध्येच कोरोना रुग्णांची संख्या जास्त आढळून येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळेच कंटेंन्मेंट झोनपेक्षा सील्ड इमारतींची संख्या जास्त असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

– ऑगस्टमध्ये मुंबईत सील इमारतींची संख्या 6171 होती. मात्र सद्यस्थितीत सील इमारतींची संख्या 8763 झाली आहे. म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत सील इमारतींची संख्या तब्बल अडीच हजारांनी वाढली आहे. तर कंटेंन्मेंट झोनची संख्या 567 वरून 592 वर गेली आहे. म्हणजेच कंटेंन्मेंट झोनची संख्या फक्त 25 ने वाढली आहे.

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पालिकेने युद्ध पातळीवर उपाययोजना करून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळणारा भाग कंटेंन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात एक रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारत सील करण्यात येत होती. मात्र रहिवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जुलैमध्ये नियमात सुधारणा करून ज्या मजल्यावर रुग्ण आढळेल फक्त तोच मजला सील करावा असे निर्देश दिले होते. मात्र सद्यस्थितीत मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने खबरदारी म्हणून दहापेक्षा जास्त रुग्ण एकाच इमारतीत किंवा दोन मजल्यावर आढळणाNया इमारती संपूर्ण सील करून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. यामध्ये एकाच घरात एकच रुग्ण आढळल्यास संबंधित मजला, इमारतीचा भाग सील करण्यात येणार आहे. अशा वेळी संपूर्ण इमारत सील केली जाणार नाही असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे दोन हजार रुग्ण आढळत आहेत.

फेरीवाल्यांना बंदी, कडक सुरक्षा
सील केलेल्या इमारतीत किंवा इमारतीच्या भागात बाहेरील व्यक्तीला, फेरीवाल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय केवळ वैद्यकीय कारणासाठी या ठिकाणच्या रहिवाशांना बाहेर जात येईल. सील इमारतीत राहणाNया रहिवाशांच्या अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी, क्वारेंटाईन असणाNयांच्या अत्यावश्यक गरजा, किराणा माल, दैनंदिन साहित्य यासाठी सोसायटीने समन्वयाने नियोजन करावे. कोणतीही कोणतीही लक्षणे असल्यास पालिकेशी संपर्वâ साधावा. नियम कठोरपणे पाळण्यासाठी सुरक्षा रक्षकाने नजर ठेवावी.

आपली प्रतिक्रिया द्या