
सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांत गणपती बाप्पाचं आगमन धुमधडाक्यात झाले आहे.
गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या गणेश मंडळांनी विविध देखावे साकारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे.
बाप्पाच्या दर्शनाला गेल्यानंतर गर्दीत आपल्यासोबतचे छोटे मूल हरवले तर घाबरून जाऊ नका. धीर बाळगा. त्वरित घटनास्थळी पोलीस किंवा सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधा.
जवळच्या मदत कक्ष किंवा तात्पुरत्या सोयीसाठी उभारलेल्या पोलीस चौकीत धाव घ्या. हरवलेल्या मुलाचे नाव, वय, उंची, रंग याची अचूक माहिती द्या.
शक्यतो छोटय़ा मुलांना एकटे सोडू नका. मुलांना तुमचे नाव, पह्न नंबरची माहिती आधीच देऊन ठेवा. मुलांना आधीच पोलिसांकडे किंवा सुरक्षा रक्षकांकडे धाव घेण्याची सूचना द्या.