हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची

महायुती सरकारने राज्यात पहिलीपासून मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीबरोबर हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. यातच महायुतीतील मंत्रींची मात्र हिंदी बोलताना चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज महायुतीतील मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिला जाणार असल्याच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. याच मुद्द्यावर पत्रकारांनी त्यांना हिंदीत एक प्रश्न विचारला असता हिंदीतून उत्तर देताना नितेश राणे याची बोबडी वळल्याच पाहायला मिळालं. पत्रकारांना हिंदीतून उत्तर देताना अक्षरश: त्यांच्या नाकी नऊ आले. शेवटी ते मराठीतच म्हणाले की, “हिंदीची सक्ती केली तर मी मरेन”.

दरम्यान, इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असतानाच महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. हिंदी भाषा ‘अनिवार्य’ या शब्दाला आम्ही स्थगिती देतोय, असं भुसे म्हणाले आहेत. एका आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे.