
डिजिटल युगात स्मार्टफोनसोबत स्मार्ट टीव्ही घराघरात पाहायला मिळतात. 32 इंचांपासून 65 इंचांपर्यंतच्या स्मार्ट टीव्हीला मोठी मागणी आहे.
जर तुमच्या स्मार्ट टीव्हीचा रिमोट काम करत नसेल, खराब झाला आहे असे वाटत असेल तर रिमोटमधील बॅटरी तपासा आणि आवश्यक असल्यास त्या बदला.
तुमचा टीव्ही रिमोटशी कनेक्ट केलेला नसेल तर त्याला पुन्हा सिंक करा. यासाठी टीव्हीच्या सेटिंग्जमध्ये जाऊन रिमोट कनेक्शन तपासा किंवा रिमोटमधील पॉवर बटण दाबून सिंक करा.
अनेक स्मार्ट टीव्हीसाठी मोबाइल अॅप उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला टीव्हीशी कनेक्ट करून रिमोट म्हणून वापरू शकता.
जर वरीलपैकी कोणत्याही उपायाने फरक पडला नाही, तर नवीन रिमोट खरेदी करणे हा उत्तम पर्याय आहे. वेबसाइटवरून किंवा दुकानात जाऊन नवीन रिमोट खरेदी करू शकता.