
1 शासकीय नोकरी करणाऱया कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शाळा बदलण्याची आवश्यकता असल्यास विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
2 शाळेत प्रवेश घेतल्यानंतर शाळा बदलण्याची परवानगी नसते, परंतु काही विशेष परिस्थितीत शाळा बदलण्याची परवानगी मिळू शकते.
3 शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखी अर्ज देऊन बदलीची आवश्यक कागदपत्रे जोडावी. ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, तेथेही अर्ज द्यावा.
4 काही प्रकरणांमध्ये शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असते. नवीन शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर पूर्वीच्या शाळेतून टीसी घ्यावा.
5 शाळा बदलल्यास विद्यार्थ्याच्या अभ्यासात खंड पडू शकतो, शक्यतो दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ असताना शाळा बदलणे टाळावे.