
सध्या डिजिटल पेमेंटने व्यवहार वाढल्यामुळे बँकेत जाणे कमी होते. तसेच बँकेच्या पासबुकवर एन्ट्री करणे कमी झाले आहे.
जर तुमचे बँकेचे पासबुक हरवले किंवा चोरीला गेले तर फार चिंता करण्याची गरज नाही. डय़ुप्लिकेट पासबुक मिळवू शकता.
जर बँकेचे पासबुक हरवले तर तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हरवल्याची तक्रार नोंदवा. चोरीला गेले की हरवले, ते सांगा.
पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवल्यानंतर ही माहिती बँकेच्या शाखेला द्या. यामुळे बँक पुढील आर्थिक व्यवहार थांबवते.
बँक शाखेत डय़ुप्लिकेट पासबुकसाठी अर्ज करा. अर्जासोबत एफआयआरची प्रत, आधारकार्ड, पॅनकार्ड खाते क्रमांक याचा तपशील द्या.