आयआयएफएल वेल्थ मुंबई बुद्धिबळ अरविंद अय्यर सबसे आगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयएफएल वेल्थ मुंबई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटात 18 वे मानांकन असलेल्या अरविंद अय्यरने सहाव्या फेरीत विजयाचा षटकार ठोकत गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. पाचव्या फेरीत अग्रमानांकित विक्रमादित्य कुलकर्णीच्या अनुपस्थितीमुळे खुल्या गटाचे चित्र बदलले असून जेतेपदाची माळ कुणाच्याही गळ्यात पडू शकते. विक्रमादित्यने बुधवारी सहावी फेरी खेळत विजयासह स्पर्धेतील आपलेही आव्हान कायम राखले आहे. तो पाच गुणांसह एकूण सहा खेळाडूंसह संयुक्तपणे तिसऱया क्रमांकावर आहे तर श्रयन मजूमदार आणि अर्जुन आदिरेड्डी 5.5 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत.

कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सुरू असलेल्या मुंबई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या खुला आणि ज्युनियर अशा दोन्ही गटांत 13 वर्षांखालील मुलांनीच जबरदस्त खेळ दाखवला आहे. ज्युनियर गटात अव्वल पाच खेळाडूंत असलेले अरविंद अय्यर, अर्जुन आदिरेड्डी हे खुल्या गटातही अव्वल पाच खेळाडूंत असल्यामुळे यापैकी एका खेळाडूने जेतेपदाचा डबल धमाका केला तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. अरविंद अय्यरने सलग सहाव्या डावात विजय नोंदवताना रित्विक कृष्णनला पराभूत केले. दोघेही प्रारंभी खूप सावध खेळत होते.